घरच्यांना प्रेमप्रकरण माहिती होताच ती चढली उड्डाणपुलावर

Foto
 दामिनी पथकाच्या सतर्कतेने वाचले तरुणीचे प्राण
प्रेमप्रकरण माहिती झाल्यानंतर घरचे रागावल्याने 19 वर्षीय तरुणी आत्महत्या करण्यासाठी महावीर चौकातील उड्डाणपुलावर चढली होती.दामिनी पथकाने वेळीच धाव घेत तरुणीचा जीव वाचविल्याची घटना आज सकाळी घडली.
बन्सीलाल नगर भागात राहणारी 19 वर्षीय तरुणी शहरातील एका महाविद्यालयात 12वी चे शिक्षण घेत आहे.तिचे एका तरुणावर प्रेम होते ही बाब घरच्यांना समजताच बुधवारी रात्री नातेवाईक तरुणीवर रागावले. हाच राग मनात धरून तरुणीने सकाळी बाबा पेट्रोल पंप जवळील महावीर चौकात असलेल्या उड्डाणपुलावर चढली ही  होती,तरुणीला बघण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
याची माहिती दामिनी पथकाला मिळताच उपनिरीक्षक वर्षाराणी आजळे,प्रियंका सरदांडे, श्रुती नांदेडकर,कविता धनवट,दिपशिक दांडगे यांनी घटनास्थळी धाव घेत तरुणीचे लक्ष दुसरीकडे विचलित करून तिला खाली ओढत प्राण वाचविले. त्यानंतर तरुणीचे समुपदेशन करून पालकांशी संपर्क साधून तरुणीला पालकांच्या स्वाधीन केले.वेळीच दामिनी पथक घटनास्थळी पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker